Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. 2024-25 अर्थसंकल्प बजेटमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकार वारंवार नवीन योजना राबवित असते. त्याचप्रमाणे आताही राज्य सरकारने Mukhyamantri Mazi ladki bahin yojana राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आज आपण याठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे? या योजनेचे मुख्य उद्देश काय आहेत? कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे? किती लाभ मिळणार आहे? लाभ घेण्यासाठी काय करावे लागणार आहे? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Overview
योजनाचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) |
शासन | महाराष्ट्र राज्य शासन |
लाभार्थी | राज्यातील सर्व महिला |
चालू वर्ष | 2024 |
GR लिंक | येथे पहा….. |
संबंधित पोर्टल | येथे पहा….. |
जर तुम्हीही Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 अंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक असाल आणि लाभ कसा घेता येणार आहे? याची सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
👉👉 Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उद्देश
राज्यातील महिलांचा कोणत्याही क्षेत्रातील सहभाग पुरुषांपेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे महिलांच्या स्वातंत्र्यवर प्रश्न निर्माण होत आहे. ही सर्व परिस्थितीचा विचार करून राज्य शासनाने राज्यातील महिलांना आर्थिक स्वावलंबी बनविण्यासाठी Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनाचे मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आणि मुलींना सर्व सोयी सुविधा देऊन त्यांना रोजगार निर्मिती करून देणे. त्यामुळे महिला आर्थिक आत्मनिर्भर बनून स्वतःचा विकास करतील. राज्यातील सर्व महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचे मुख्य उद्देश समोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 ची घोषणा 2024-25 च्या आर्थिक बजेटमध्ये करण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी पात्रता (Beneficiary of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana)
![Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana](https://sarkariyojanaportal.in/wp-content/uploads/2024/07/Mukhyamantri-Maji-Ladki-Bahin-Yojana-1-1024x536.webp)
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 अंतर्गत काही महत्वाच्या पात्रता अटी व नियम ठरवण्यात आले असून पात्रता अटीची पूर्तता करणाऱ्या सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पात्रता पुढीलप्रमाणे –
- अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- महिलाचे वय किमान 21 वर्ष व जास्तीत जास्त 60 वर्ष एवढे असावे.
- विधवा, विवाहित आणि घटस्फ़ोटीत महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
- अर्जदाराच्या संपूर्ण कुटुंबाचे एकूण उत्पन्न 2.50 लाख पेक्षा कमी असावे.
- त्याचबरोबर अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंक असणे आवश्यक आहे.
- निराधार महिलांना अधिक प्राधान्य देण्यात आलेले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 अंतर्गत लाभ घेण्यासाठी वरील पात्रताची पूर्तता करणे आवश्यक आहे.
आपल्या गावातील कोणत्या जमिनीची खरेदी आणि विक्री झाली पहा फक्त 5 मिनिटात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी अपात्रता अटी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 लाभार्थी अपात्रता अटी पुढीलप्रमाणे –
- अर्जदाराच्या संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख पेक्षा जास्त असल्यास त्या कुटुंबातील सर्व महिला अपात्र असणार आहेत.
- आयकरदाता सदस्य असलेल्या महिला अपात्र असतील.
- ज्या कुटुंबातील कोणीही एक सदस्य सरकारी नौकरी वर असल्यास त्या कुटुंबातील महिला अपात्र असतील.
- 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असल्यास त्याचबरोबर कुटुंबातील कोणी एका व्यक्तीच्या नावावर चारचाकी गाडी असल्यास त्या कुटुंबातील महिलाही अपात्र असणार आहेत.
अश्याप्रकारे अनेक अपात्रता अटी मुख्यमंत्री यांच्याद्वारे ठरवण्यात आलेल्या आहेत.
E Pik Pahani Online Maharashtra | ई पीक पाहणी | आजच करा पीक पाहणी अन्यथा होईल खूप मोठे नुकसान.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 आवश्यक कागदपत्र
खालील सर्व कागदपत्रांची पुरतात करणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आवश्यक कागदपत्र यादी पुढीलप्रमाणे –
- अर्जदार महिलांचे आधार कार्ड
- स्वघोषणा प्रमाणपत्र
- जन्म दाखला
- उत्पन्न दाखला
- रहिवाशी प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईझ फोटो
- रेशन कार्ड
वरील सर्व कागदपत्रांची पुरतात करून राज्यातील सर्व महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 अर्ज प्रक्रिया
1) ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Mukhyamantri Mazi ladki Bahin Yojana 2024 अंतर्गत लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महिलांना जवळील सुविधा केंद्र किंवा CSC केंद्रावर जाऊन अर्ज भरून लाभ घेऊ शकतात.
2) ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 अंतर्गत लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने ऑफलाईन अर्ज प्रक्रियाही सुरु केलेली आहे. ज्या महिला सुविधा केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज भरू शकत नाहीत, अश्या महिला आपल्या जवळील अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत येथे ऑफलाईन अर्ज भरू शकतात.
ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी वरील आवश्यक कागदपत्र घेऊन जवळील अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत येथे जमा करावेत. येथील संबंधित अधिकारी तुमचा अर्ज भरून तुम्हांला अर्जाची पोच पावती दिली जाईल.
अर्जदार महिला अर्ज भरण्याच्या ठिकाणी स्वतः उपस्थित असणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या महिलांचा थेट फोटो कडून e-kyc करण्यात येते.
अर्ज प्रक्रिया शुल्क
या योजनेसाठी अर्ज करताना कोणत्याही प्रकारचा शुल्क आकरण्यात येत नसून सर्व अर्ज प्रक्रिया मोफत करण्यात आलेली आहे.
FAQ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नक्की काय आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 या योजनेची घोषणा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारे 2024-25 च्या आर्थिक बजेटमध्ये करण्यात आलेली आहे. या योजनेतर्गत राज्यातील विधवा, विवाहित त्याचबरोबर घटस्फ़ोटीत महिलांना महिन्याला 1500₹ एवढी मदत थेट बँक खात्या जमा करण्यात येणार आहेत.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 ची घोषणा कोणी केली आहे?
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया काय आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्या जवळील ऑनलाईन सुविधा केंद्र किंवा CSC सेंटरमध्ये ऑनलाईन अर्ज करू शकतात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 साठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया काय आहे?
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana ऑफलाईन अर्ज करण्यासाठी महिला आपल्या जवळील अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत येथे जाऊन संबंधित आवश्यक कागदपत्र जमा करून अर्ज करू शकतात.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनातर्गत अर्ज करण्याची सुरुवात कधी होणार आहे?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज करण्याची सुरुवात 1 जुलै 2024 पासून करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री माझी बहीण योजना अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज करण्याची शेवट तारीख 15 जुलै 2024 ही आहे.
Conclusion
तर मित्रांनो आज आपण याठिकाणी या लेखाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेतली आहे. जसे – mukhyamantri majhi ladki bahi yojana काय आहे? कोणत्या महिला लाभ घेऊ शकतात? पात्रता अटी व नियम कोणते आहेत? किती लाभ मिळणार आहे? अर्ज कश्याप्रकारे करता येणार आहे? अर्ज करण्याची शेवट तारीख किती आहे? अश्या अनेक प्रश्नांची माहिती तुम्हाला आज या लेखच्या माध्यमातून मिळाली असेलच. त्याचबरोबर या योजनेसंबंधित काही अडचण असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
आणि अश्याच नवनवीन सरकारी योजनांसंबंधित सर्व अपडेट्स घरबसल्या जाणून घेण्यासाठी खालील व्हाट्सअप बटणवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन होऊ शकता. धन्यवाद!