Namo Shetkari Yojana 2024 :- नमस्कार मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली पीएम किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकरी वार्षिक 6000 रुपयांचा लाभ घेत आहेत. आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण राज्य शासनाने नमो शेतकरी योजना 2024 अंतर्गत पीएम किसान सम्मान निधी योजनाप्रमाणेच वर्षाला अतिरिक्त 6000 मिळणार आहेत. या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी घेऊ शकता. जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर आता तुम्हाला पीएम किसान योजनेसोबत नमो शेतकरी योजनांचाही लाभ मिळणार आहे.
मित्रांनो आज आपण या ठिकाणी namo shetkari yojana 2024 या योजनेबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. जसे – नमो शेतकरी योजना काय आहे? या योजनेचा लाभ कोणाला मिळणार? किती लाभ मिळणार? आवश्यक कागदपत्र कोणते आहेत? त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याची सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
तुम्ही एक शेतकरी असाल आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असाल, तर आजचा हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा लेख ठरणार आहे. तुम्हाला हि माहिती कशी वाटली? कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, त्याचबरोबर अशीच अनेक सरकारी योजनांची माहिती घरबसल्या व्हाट्सअँप वर मिळवण्यास इच्छुक असाल तर तुम्ही आमचा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करून सरकारी योजना बद्दल सर्व नवनवीन अपडेट मिळतील.
Namo Shetkari Yojana Overview
योजनाचे नाव | नमो शेतकरी योजना 2024 (Namo Shetkari Yojana 2024) |
शासन | राज्य शासन |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी |
लाभ | वार्षिक 6000 रुपये |
चालू वर्ष | 2024 |
अधिकारीक वेबसाईट | येथे पहा… |
नमो शेतकरी योजना 2024
Namo Shetkari Yojana 2024 ही योजना राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची योजना आहे, कारण या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेप्रमाणेच वर्षाला 6000 जमा करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री यांनी घेतला आहे.
नमो शेतकरी योजना ही योजना राज्य शासनाची योजना असून महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप महत्वाची योजना ठरली आहे. राज्यातील बरेच शेतकरी या योजनेचा लाभ घेत असून अजूनही राज्यातील असे काही रहिवाशी आहेत, जे या योजनेपासून वंचित आहेत. जे शेतकरी या Namo Shetkari Yojana पासून वंचित आहेत. किंवा या पूर्वी लाभ घेत होते परंतु आता काही तांत्रिक अडचणीमुळे लाभ घेऊ शकत नसतील अश्या शेतकऱ्यांसाठी आजचा हा लेख अत्यंत महत्वाचा लेख ठरणार आहे, कारण आज आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
हेही वाचा: PMEGP कर्ज योजना 2024 | सबसिडी योजना 2024 | प्रधानमंत्री रोजगार योजना
लाभ
नमो शेतकरी योजनाचे पैसे दर 4 महिन्याला 2000 रुपये याप्रमाणे वर्षाला 6000 रुपये थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार असून फेब्रुवारी ते मे या महिन्यात पहिला हप्ता तर जून ते सप्टेंबर या महिन्यात दुसरा हप्ता आणि ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यात तिसरा हप्ता जमा होणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी Namo Shetkari Yojana 2024 चा लाभ घेऊ शकणार आहेत.
पात्रता
- महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे आवश्यक.
- लाभ घेण्यासाठी शेती नावावर असावी.
- किमान वय 18 वर्ष पूर्ण असावे.
- पीएम किसान सम्मान निधी योजनाचा लाभ घेत असल्यास त्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिली आहे.
अपात्रता अटी.
- ज्या शेतकऱ्यांनी 1/1/2019 नंतर जमीन नावावर केलेली आहे असे शेतकरी अपात्र असणार आहेत.
- त्याचबरोबर टॅक्स भरणारे आणि स्वतःचा व्यवसाय करणारे शेतकरी अपात्र असतील.
- दर महिन्याला 10000₹ पेक्षा जास्त पेन्शन धारक शेतकरी.
- लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये कार्यरत असणारे व्यक्ती.
- डॉक्टर, वकील, इंजिनीयर असे व्यक्ती.
हेही वाचा: पीएम मुद्रा लोन योजना | आवश्यक कागदपत्र | ऑनलाईन अर्ज.
आवश्यक कागदपत्र
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईझ फोटो
- 7/12 व 8अ
- मोबाईल नंबर
- उत्पन्न दाखला
- रहिवाशी प्रमाणपत्र
ऑनलाईन अर्ज
![Namo Shetkari Yojana 2024](https://sarkariyojanaportal.in/wp-content/uploads/2024/06/Namo-Shetkari-Yojana-2024-1024x536.webp)
जे शेतकरी पीएम किसान सम्मान निधी योजनेचा ऑनलाईन अर्ज करून लाभ घेत आहेत अश्या शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. परंतु जे शेतकरी पीएम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ घेत नाही अश्या शेतकऱ्यांनी पीएम किसान सम्मान निधी योजनेचा ऑनलाईन अर्ज करून पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना अश्या दोन्ही योजनेचा लाभ घेऊ शकतात.
खाली पीएम किसान सम्मान निधी योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सर्व माहिती काळजीपूर्ण वाचून ऑनलाईन अर्ज करू शकता.
- सर्वात आधी अधिकारिक पोर्टल ला भेट द्या, किंवा “नवीन शेतकरी अर्ज” या लिंक क्लिक करा.
- तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल. यामध्ये तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर आणि राज्य निवडून बॉक्स मध्ये दिलेला कॅप्चर कोड आहे तसा लिहा आणि “Get OTP” या बटणवर क्लिक करा.
- तुमच्या मोबाईल नंबर वरती एक OTP येईल. तो OTP लिहून “Submit” बटणवर क्लिक करा. तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुमचा सर्व पत्ता आणि शेती संबंधित सर्व माहिती जसे 7/12 आणि 8अ नंबर भरा.
- आता तुम्हाला कागदपत्र अपलोड करण्यास सांगितले जाईल. सर्व कागदपत्र काळजीपूर्वक अपलोड करून “Submit” बटण वर क्लिक करा.
अश्या प्रकारे तुम्ही पीएम किसान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
FAQ
नमो शेतकरी योजना काय आहे?
नमो शेतकरी योजना केंद्र शासनाच्या पीएम किसान सम्मान निधी योजना प्रमाणेच राज्य शासनाची योजना असून या योजनेतर्गत लाभार्थी शेतकरी यांच्या बँक खात्यात दर 4 महिन्याला 2000₹ याप्रमाणे वर्षाला एकूण 6000₹ जमा होणार आहेत.
नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता?
या योजनेचा पहिला हप्ता 28 जुलै 2023 मध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे.
नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता?
या योजनेचा दुसरा हप्ता 29 फेब्रुवारी 2024 मध्ये बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे.
Namo Shetkari Yojana 2024 चा लाभ घेण्यासाठी किमान किती शेती असणे अनिवार्य आहे?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची शेती मर्यादा अनिवार्य नाही.
नमो शेतकरी योजना ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
या योजनेसाठी कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. जे शेतकरी पीएम किसान या केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ घेत आहेत असे सर्व महाराष्ट्र राज्यातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. परंतु यासाठी पीएम किसान योजनेची EKYC करणे गरजेचे आहे.
Conclusion
तर मित्रांनो आजच्या या लेखाच्या मदतीने आपण Namo Shetkari Yojana 2024 बद्दल सर्व माहिती अत्यंत विस्तारपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे कि आजच्या या लेखाच्या मदतीने तुम्हाला नमो शेतकरी योजनाबद्दल असणारे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालेली असतीलच. जसे – Namo Shetkari Yojana 2024 काय आहे? कोणते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात? कोणत्या राज्यापूरती ही योजना मर्यादित आहे? किती लाभ मिळणार? अर्ज कसा करायचा? अशा अनेक प्रश्नाची उत्तरे मिळाली असतीलच.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली कॉमेंटबॉक्स मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर सरकारी योजनाचे सर्व नवनवीन अपडेटची माहिती घरबसल्या हवी असेल, तर खाली दिलेला व्हाट्सअँप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. या ग्रुपमध्ये आम्ही दररोजचे सरकारी योजना संबंधित नवनवीन माहिती पाठवत असतो.