PM Mudra Loan Yojana Online Apply 2024 – नमस्कार मित्रांनो आणि मैत्रणींनो तुम्हाला तर माहिती असेलच की आपले सरकार देशामध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविताना दिसत आहे. या योजनामध्ये PM Mudra Loan Yojana ही योजना अत्यंत महत्वाची योजना ठरली आहे. कारण या योजनेतर्गत राज्यातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय करण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होत आहे. तसेच पीएम मुद्रा लोन योजना 2024 अंतर्गत देशातील बऱ्याच तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रधानमंत्री यांच्याकडून 50 हजार ते 10 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज वाटप केले जात असून देशातील तरुण चांगलेच उत्पन्न मिळवत आहे.
आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण याच पीएम मुद्रा लोन योजना ऑनलाईन अर्ज कसा करायचा? लाभ कसा मिळणार आहे? किती रुपये पर्यंत लोन मिळणार आहे? कोणकोण लाभ घेऊ शकतात? त्याचबरोबर या योजनेचे मुख्य उद्देश काय आहेत? याची सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
तुम्ही ही प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना चा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास इच्छुक असाल पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय करावे लागते हे माहिती नाही. तर आजचा हा लेख तुमच्या साठी अत्यंत महत्वाचा लेख ठरणार आहे.
PM Mudra Loan Yojana 2024
स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास इच्छुक असणाऱ्या तरुणांना पीएम मुद्रा लोन योजना 2024 अंतर्गत 50 हजार ते 10 लाख रुपये बिनव्याजी कर्ज वाटप केले जात आहे. या योजनेची सुरु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केली असून देशातील तरुणांनी या योजनेला चांगला प्रतिसाद दिला आहे.
तुम्हीही तुमचा नवीन व्यवसाय सुरु करू पाहत असाल किंवा तुमचा जुना व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेऊ पाहत असाल तर पीएम मुद्रा लोन तुमच्यासाठी अत्यंत चांगला पर्याय आहे. कारण बाहेरून घेतलेल्या कर्जावर व्याज खूप मोठ्या प्रमाणात द्यावे लागत असते हे तर आपल्याला माहिती आहेच. परंतु मुद्रा लोन योजनेतर्गत कर्ज घेतल्यास त्या कर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याज देण्याची गरज नाही.
हेही वाचा :- PMEGP कर्ज योजना 2024 | सबसिडी योजना 2024 | प्रधानमंत्री रोजगार योजना
आपण घेतलेल्या कर्जाचे व्याज हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून बिनव्याजी कर्ज वाटप केले जात असून PM Mudra Loan Yojana या योजनेतर्गत 50 हजार ते 10 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज घेऊन स्वतःचा नवीन व्यवसाय करू शकता. त्याच्याबरोबर तुमचा जुना व्यवसाय असेल तर तो व्यवसाय वाढवण्यासाठी मुद्रा लोन चा वापर करू शकता.
पीएम मुद्रा लोन 2024 चे उद्देश
देशातील बरेच तरुण सुशिक्षित असूनही नौकरी मिळत नसल्याने बेरोजगार आहेत. त्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि स्वतःचे जीवन चांगले जगू शकतात. या आधुनिक काळात पैसे कमवणे खूप गरजेचे आहे, परंतु आता तरुण या योजनेचा लाभ घेऊन अधिक उत्पन्न मिळवू शकणार आहेत.
जर तुम्ही बेरोजगार सुशिक्षित तरुण असाल आणि तुम्ही स्वतःचा व्यवसाय करण्यास इच्छुक आहेत. परंतु स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत तर तुम्ही प्रधानमंत्री नरेदी मोदी याच्याद्वारे दिले जाणारे PM Mudra Loan Online Apply करून व्यवसाय सुरु करू शकता.
त्याच्याबरोबर या योजनेची रक्कम लाभार्थीच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. परंतु या साठी प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 2024 ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित बँक अधिकारी अर्जाची पडताळणी करून कर्ज मंजुरी मिळण्यानंतर कर्जाची सर्व रक्कम बँक खात्यात जमा केली जाईल.
हेही वाचा :-
आवश्यक कागदपत्र – PM Mudra Loan Yojana Documents
PM Mudra Loan Yojana 2024 चा लाभ घेण्यासाठी अर्जदाराजवळ खालील कागदपत्र असणे गरजेचे आहे. आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांची यादी खाली दिलेली आहे.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- 10 वी किंवा 12 वी गुणपत्रक
- शाळा सोडल्याचा दाखला
- जो व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायांच्या खर्चाचा अहवाल
- पासपोर्ट साईझ फोटो
मुद्रा लोन योजनेचे प्रकार
पीएम मुद्रा लोन योजनेतर्गत लाभ घेण्यापूर्वी हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे की या मुद्रा लोन योजनेचे मुख्य तीन प्रकार आहेत. ज्यांतर्गत तरुणांना वेगवेगळे लाभ मिळणार आहेत. PM Mudra Loan Yojana च्या तीन मुख्य प्रकाराची संपूर्ण माहिती सविस्तरपणे खाली दिलेली आहे.
- शिशू मुद्रा लोन योजना
शिशू मुद्रा लोन योजनेतर्गत लाभार्थीला 10000 हजार ते 50000 रुपये पर्यंत वैयक्तिक बिनव्याजी कर्ज वाटप केले जात असून हे कर्ज घेणे अत्यंत सोपे आहे.
- किशोर मुद्रा लोन योजना
किशोर मुद्रा लोन योजनेतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थीला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी 50000 ते 500000 (50 हजार ते 5 लाख) रुपये एवढे कर्ज वाटप केले जात आहे.
- तरुण मुद्रा लोन योजना
तरुण मुद्रा लोन योजनेतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थीला स्वतःचा नवीन व्यवसाय करण्यासाठी किंवा जुना व्यवसाय वाढविण्यासाठी 500000 ते 1000000 (5 लाख ते 10 lakh) रुपये कर्ज वाटप केले जात असून हे कर्ज घेणे थोडे अवघड आहे.
हेही वाचा :-
ऑनलाईन अर्ज – Pradhanmantri Mudra Loan Yojana 2024 Online Apply
![PM Mudra Loan Yojana online Apply](https://sarkariyojanaportal.in/wp-content/uploads/2024/04/PM-Mudra-Loan-Yojana-online-Apply-1024x536.webp)
PM Mudra Loan Yojana Online Apply करण्यासाठी खालील स्टेपचा उपयोग करून कर्ज घेऊ शकता.
- सर्वात आधी मुद्रा लोन योजना ची अधिकारिक वेबसाईट www.mudra.org.in या पोर्टल भेट द्या.
- त्यानंतर तुम्हाला या पोर्टलच्या होम पेज वर शिशु मुद्रा लोन, किशोर मुद्रा लोन आणि तरुण मुद्रा लोन असे तीन पर्याय दिसतील. यातील तुम्ही जे कर्ज घेण्यास इच्छुक आहेत त्या पर्यायावर क्लिक करा.
- योग्य पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला अर्ज डाउनलोड करण्यास सांगितले जाईल. अर्ज डाउनलोड केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट कडून घ्या.
- अर्जाची प्रिंट काढल्यानंतर अर्जंमध्ये विचारलेली सर्व माहिती वाचून योग्य प्रकारे माहिती भरून घ्या.
- त्यानंतर वरील सर्व कागदपत्र अर्जाला जोडून आपल्या जवळील बँकेमध्ये तो अर्ज जमा करा.
अर्ज व इतर सर्व कागदपत्र बँकेत जमा केल्यानंतर संबंधित बँक अधिकारी अर्जाची पडताळणी करून अर्ज मंजूर करतील. अर्जास मंजुरी मिळाल्यानंतर काही दिवसात कर्जाची सर्व रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल.
हेही वाचा :-
FAQ
पीएम मुद्रा लोन योजना 2024 काय आहे?
देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी स्वतःचा व्यवसाय करून आर्थिक प्रगती करावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली अत्यंत महत्वाची योजना आहे.
पीएम मुद्रा लोन योजनेतर्गत किती रुपये कर्ज वाटप केले जात आहेत?
मुद्रा लोन योजनेचे तीन भागात रूपांतर केले असून शिशु मुद्रा लोन योजनेतर्गत 50000 रुपये ते किशोर मुद्रा लोन योजनेतर्गत 50000 ते 500000 रुपये तर तरुण मुद्रा लोन योजनेतर्गत 500000 ते 1000000 रुपये एवढे कर्ज वाटप केले जात आहे.
पीएम मुद्रा लोन योजना 2024 लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात?
पीएम मुद्रा लोन योजना 2024 अंतर्गत लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, 10 वी आणि 12 वी गुणपत्रक त्याचबरोबर नवीन व्यवसाय करण्यासाठी येणाऱ्या सर्व खर्चाचा अहवाल असे कागदपत्र लागतात.
PM Mudra Loan Yojana 2024 चे मुख्य उद्देश काय आहे?
पीएम मुद्रा लोन योजना अंतर्गत देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास मदत करून त्यांना आर्थिक आत्मनिर्भर करणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
मुद्रा लोन योजनेची सुरुवात कधी झाली आहे?
मुद्रा लोन योजनेची सुरुवात 8 एप्रिल 2015 मध्ये झाली आहे.
Conclusion:-
मित्रांनो आज आपण या लेखाच्या माध्यमातून पीएम मुद्रा लोन योजनेची सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेतली आहे. जसे – पीएम मुद्रा लोन योजना काय आहे? कोणकोण या योजनेचा लाभ घेऊ शकतात? त्याच्याबरोबर या योजनेतर्गत किती लाभ मिळणार? कोणकोणते कागदपत्र लागतात? तसेच ऑनलाइन अर्ज कसा करायचा? याची सर्व माहिती जाणून घेतली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि अशीच नवनवीन माहिती घरबसल्या मिळवण्यासाठी व्हाट्सअँप ग्रुप नक्की जॉईन करा.