PM Suryoday Yojana 2024: नमस्कार मित्रांनो आपल्याला तर माहिती आहेच कि आपले केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी वारंवार नवनवीन योजना राबवीत असते. आणि आता केंद्र सरकारने पुन्हा एकदा अजून एक नवीन आणि अत्यंत भन्नाट अशा योजनाची घोषणा केली आहे. ती योजना आहे पीएम सूर्योदय योजना. ही योजना अत्यंत देशातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची योजना असून या योजनेतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे.
सध्याचे भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM Suryoday Yojana ची घोषणा केली असून देशातील नागरिकांना फ्री सोलर पॅनल वाटप करण्यात येणार आहेत. जर तुम्ही भारत देशाचे नागरिक असाल आणि तुम्ही तुमच्या वाढत्या वीजबिलापासून त्रस्त असाल त्याचबरोबर या वाढत्या वीजबिलपासून मुक्ती हवी असेल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा लेख ठरणार आहे.
PM Suryoday Yojana Overview
योजनाचे नाव | पीएम सूर्योदय योजना (PM Suryoday Yojana 2024) |
शासन | केंद्र शासन |
देश | भारत |
चालू वर्ष | 2024 |
लाभार्थी | भारत देशातील सर्व नागरिक |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकारिक पोर्टल | येथे पहा…. |
आपले केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी सतत नवनवीन योजना घेऊन येत असते आणि आता ही आपल्या भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्योदय योजनेची घोषणा केली आहे. आज आपण या लेखच्या मदतीने पीएम सूर्योदय योजना काय आहे? या योजनेचा लाभ कसा मिळवता येणार आहे? किती लाभ मिळणार आहे? आवश्यक कागदपत्र कोणते आहेत? ऑनलाईन आज कसा करायचा? कोणते नागरिक पात्र असणार आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.
अशाच अनेक योजनाची माहिती आणि नवनवीन योजनाची माहिती घरबसल्या मिळवण्यासाठी तुम्ही आमचा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करू शकता.
हेही वाचा :
नमो शेतकरी योजना 2024 | ऑनलाईन अर्ज प्रक्रिया | आवश्यक कागदपत्र येथे पहा संपूर्ण माहिती
पीएम सूर्योदय योजना (PM Suryoday Yojana 2024)
22 जानेवारी 2024 मध्ये आपले सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोद्धा येथील राम मंदिर च्या प्राण प्रतिष्टीत कार्यकामावरून माघारी येताना देशातील नागरिकांसाठी पीएम सूर्योदय योजनेची घोषणा केली आहे. या योजनेमुळे वाढत्या वीजबिलच्या समस्यापासून देशातील नागरिकांची सुटका होण्यास मदत होणार आहे.
या योजनेतर्गत देशातील 1 कोटी नागरिकांना त्यांच्या घरावर सोलर पॅनल लावले जाणार असून सोलर पॅनल लावण्यास केंद्र सरकार करून अनुदान दिले जाणार आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री सूर्योदय योजनामुळे देशातील गरीब नागरिकांचे वीज बिलं कमी होण्यास मदत मिळणार असून, गरिबांसाठी ही योजना अत्यंत महत्वाची योजना आहे.
पीएम सूर्योदय योजना उद्देश
वीज बिलाचा वाढता खर्च ही देशातील अत्यंत महत्वाची समस्या असून नागरिक या समस्या पासून त्रस्त झाले आहे. बरेच नागरिक या समस्या पासून मुक्त होण्यास उत्सुक आहेत. या सर्व गोष्टी लक्ष्यात घेता सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पीएम सूर्योदय योजनाची घोषणा केली आहे. केंद्र सरकार वारंवार गरीब नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवित असून या वेळेसही केंद्र सरकारने सुरु केलेली ही योजना देशातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची योजना ठरत आहे.
सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी 20% ते 50% अनुदान केंद्र सरकार देत असून आता प्रत्येक जण आपल्या घरावर सोलर पॅनल लावू शकणार आहे.
हेही वाचा :
शेळी पालन शेड अनुदान योजना 2024 | शेड बांधण्यासाठी शासनाकडून मिळणार 100% अनुदान ऑनलाइन अर्ज सुरु
पीएम सूर्योदय योजना लाभ (PM Suryoday Yojana 2024 Benefits)
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 ला आयोद्धा येथील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा च्या कार्यकामावरून माघारी येताना पीएम सूर्योदय योजना ची घोषणा केली आहे. या योजनेचा लाभ देशातील 1 कोटी नागरिक घेऊ शकणार आहेत.
त्याचबरोबर देशातील गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांसाठी ही योजना अत्यंत महत्वाची योजना आहे, कारण आपल्या घरावर सोलर पॅनल लावून आपण वीजबिलापासून मुक्ती मिळवू शकणार आहोत.
पीएम सूर्योदय योजना आवश्यक कागदपत्र (PM Suryoday Yojana 2024 Documents)
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्न दाखला
- पासपोर्ट साईझ फोटो
- मोबाईल नंबर
- रहिवाशी दाखला
- वीज बिल
- बँक पासबुक
पीएम सूर्योदय योजनाचा लाभ घेण्यासाठी वरील सर्व कागदपत्र आवश्यक असल्याने सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनच या प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
हेही वाचा :
पीएम सूर्योदय योजना पात्रता
Prashan Mantri Suryoday Yojana 2024 अंतर्गत लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने काही पात्रता अटी ठेवलेल्या आहेत. खाली पात्रता पूर्ण करणारे सर्व नागरिक पीएम सूर्योदय योजना लाभ घेऊ शकतात.
- अर्जदार हा भारत देशाचा रहिवाशी असावा.
- त्याचबरोबर देशातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या नागरिकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे.
- अर्जदार ज्या घरावर सोलर पॅनल लावण्यास इच्छुक आहे, ते घर अर्जदाराच्या नावावर असणे अनिवार्य आहे. किंवा कुटुंबातील ज्या व्यक्तीच्या नावावर घर किंवा लाईटबील आहे अश्या व्यक्तीच्या नावावर अर्ज करून लाभ घेऊ शकतात.
- आणि सर्वात महत्वाचे या योजनेतर्गत अनिवार्य असणारे सर्व कागदपत्र अर्जदाराजवळ असावेत.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 8 लाख पेक्षा जास्त नसावे.
वरील सर्व पात्रता अटी पूर्ण करून नागरिक प्रधानमंत्री सूर्योदय योजनाचा लाभ घेऊ शकतात.
पीएम सूर्योदय योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (PM Suryoday Yojana 2024 Online Apply)
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले असून देशातील सर्व नागरिक घरी बसून आपल्या मोबाईल च्या मदतीने ऑनलाईन अर्ज करू शकतात, त्याचबरोबर आपण जवळील CSC सेंटर वर जाऊन अर्ज करू शकता. घर बसल्या मोबाइलच्या मदतीने अर्ज कसा करायचा? याची सर्व माहिती खाली दिलेली आहे. सर्व माहिती स्टेप बाय स्टेप वापरून ऑनलाईन अर्ज करू शकता.
- सर्वात आधी PM Suryoday Yojana च्या अधिकारिक पोर्टला भेट द्या किंवा या योजनाच्या अधिकारिक पोर्टलची लिंक खाली दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही थेट पोर्टला ओपन करू शकता.
- त्यानंतर होमपजे वर “Apply For Roof Top” असे लिहिलेले दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक अर्ज ओपन होईल या मध्ये वरील “Registration” यावर क्लिक करा. आणि तुमचे राज्य, जिल्हा, Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd आणि आपला लाईट बिल नंबर लिहून त्या खालील कॅप्चर कोडं आहे तसा लिहून “Next” बटणवर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल अर्जमध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरून “Submit” बटणवर क्लिक करा.
- तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल तो OTP लिहून “Apply” बटणवर क्लिक करा.
अश्या प्रकारे तुमची यशस्वीरित्या तुम्ही PM Suryoday Yojana 2024 Online Registration करू शकता. त्यानंतर काही दिवसांनी संबंधित अधिकारी तुमच्याशी संपर्क करून तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवले जाईल.
👇👇👇
पीएम सूर्योदय योजना ऑनलाईन अर्ज येथे करा.
☝️☝️☝️
FAQ
PM Suryoday Yojana 2024 काय आहे?
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 रोजी आयोद्धा येथील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यकर्मावरून वापस येताना देशातील गरीब आणि आर्थिक दृष्ठ्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांना वाढत्या वीजबिलापासून मुक्त करण्यासाठी एक नवीन योजनाची घोषणा केली होती. त्या योजनाचे नाव आहे पीएम सूर्योदय योजना.
पीएम सूर्योदय योजनेतर्गत किती टक्के अनुदान केंद्र सरकार देणार आहे?
या योजनेतर्गत घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी कमीत कमी 20% ते जास्तीत जास्त 50% अनुदान केंद्र सरकार देणार आहे.
पीएम सूर्योदय योजनाची ऑफिसिअल वेबसाईट कोणती आहे?
www.pmsuryaghar.gov.in ही पीएम सूर्योदय योजनाची ऑफिसिअल वेबसाईट असून देशातील नागरिक या पोर्टलच्या मदतीने ऑनलाईन अर्ज करू शकतात.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेतर्गत 1kw चे सोलर पॅनल घरावर बसवण्यास किती रुपये अनुदान मिळू शकते?
या योजनेतर्गत 1kw चे सोलर पॅनल घरावर बसवण्यासाठी ₹30000 अनुदान मिळू शकतात.
2kw चे सोलर पॅनल पीएम सूर्योदय योजनेतर्गत घरावर बसवण्यास एकूण किती रुपये अनुदान मिळू शकते?
2kw चे सोलर पॅनल घरावर बसवण्यासाठी केंद्र सरकार एकूण ₹60000 एवढे अनुदान देत आहे.
3kw चे सोलर पॅनल बसवण्यासाठी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेतर्गत एकूण किती रुपये अनुदान मिळू शकते?
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेतर्गत 3kw चे सोलर पॅनल घरावर बसवण्यासाठी एकूण ₹78000 एवढे अनुदान केंद्र सरकार देत आहे.
पीएम सूर्योदय योजनेतर्गत जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती किलोवाट चे सोलर पॅनल घरावर बसवू शकतो?
या योजनेतर्गत कमीत कमी 1 किलोवाट आणि जास्तीत जास्त 3 किलोवाट चे सोलर पॅनल घरावर बसवू शकतो.
Conclusion
तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर पीएम सूर्योदय योजनेसबंधित काही अडचण असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.